पुणे- १० नोंव्हेबर २०२१ रोजी मल्हारमाची रिसॉर्ट मध्ये मल्हारमाची स्काय व्हिला या नवीन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला हडपसर मधील मराठी शेतकरी कुटुंबातील ज्यांनी मगरपट्टा नांदेडसिटी सारखे टाऊनशीप निर्माणकेली तसेच चेअरमन क्रिडाई नॅशनल सतिशदादा मगर, आमदार भिमराव अण्णा तापकीर, आमदार सुनिल अण्णा शेळके, भारत वीकास ग्रुप एम. डी. हणुमंतजी गायकवाड, प्रेसिडेंट प्रहा हॉटेल असोशियन एस पी’ज बिर्याणी हाऊस, निसर्ग हॉटेल चे जवाहर शेठ चोरगे, सदाशिव(बापूजी) सातव माज़ी नगराध्यक्षबारामती, चेअरमन महालक्ष्मी मारुति सुज़ुकी. रिटायर्ड पुणे शहर पोलीस उपआयुक्त भानुप्रताप बर्गे यांची उपस्थिती होती.
स्काय व्हिला हा प्रोजेक्ट जमिनी पासून ३५ फुट उंचावर असून वूडन रूम, रस्टिक इंटिरियर डिजाईन, ओपन एअर शॉवर, मेझानाइन स्लीपिंग लहान मुलांसाठी, समोर बाल्कनी ३६० डिग्री व्हिव व हवेत अधांतरती स्विमिंग पूल व समोर मुळशी डॅम व खाली झाडांचे जंगल, पाठीमागे डोंगर असा निसर्ग रम्य प्रकल्प आहे.
सतीश दादा मगर यांनी बोलताना सांगितले की, मल्हार माची मध्ये १०० खोल्या निर्माण कराव्यात. त्या कायम फुल राहतील कारण परिसर अतिशय सुंदर व निसर्गरम्य आहे. जेवण चवदार, तसेच सर्विस स्वच्छता देखील छान आहे. याच गोष्टींमुळे येथील १०० खोल्या देखील कायम फुल राहतील.
हा प्रकल्प कामाचा उत्तम दर्जा राखून एक वर्षात पूर्ण करण्याचा मानस स्वरा ग्रुप चा आहे असे रामदास भाऊ मुरकुटे व डॉ बाबूल पठाण यांनी सांगितले.