पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने विसर्जन मिरवणुकीची तयारी केली असून, नागरिकांसाठी काही सूचना आणि आवाहनही केले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने डेक्कन जिमखाना (नटराज टॉकीज जवळ) पुणे आणि नूतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वैद्यकीय पथक तीनही शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑक्झिलरी नर्स, ज्युनिअर नर्स, नर्सिंग ऑर्डली आणि वाहनचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाचे आवाहन
* गुलाल चेहऱ्याला लावल्याने डोळ्यात गेल्यास अपाय होण्याची शक्यता असते. तसेच गुलाल मोठ्या प्रमाणात उधळल्याने हवेचे प्रदूषण होऊन नागरिकांना डोळ्याचे आणि श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते.
* नागरिकांनी गुलाल चेहऱ्यास लावण्याचे टाळून तो फक्त कपाळावर लावावा. गुलाल तोंडावर फेकू नये. डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
* गुलाल उधळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.