पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. शांताबाई महादेव सूर्यवंशी (वय 80, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी पुणे सोलापूर रस्त्यावरून निघाल्या होत्या. कदमवाक वस्ती परिसरात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला असून पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.