पुणे – 971 कार्यालयांची बिंदूनामावली तपासणी पूर्ण

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात बाजी

पुणे – पुणे विभागातील 971 शासकीय कार्यालयांच्या बिंदूनामावलीची (रोस्टर) तपासणी मागासवर्गीय कक्षाने तीन महिन्यांत पूर्ण केली आहे. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात या कक्षाने बाजी मारली आहे.

राज्य शासनाची विविध कार्यालये सर्वच जिल्ह्यामध्ये आहेत. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदूनामावली तयार करुन त्याची अंतिम तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून करुन घेणे बंधनकारक आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील बिंदूनामावली तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मागासवर्गीय कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. काही कार्यालयांनी आचारसंहितेपूर्वी बिंदूनामावलीची तपासणी पूर्ण करुन घेतली आहे. तर काही कार्यालयांनी अद्याप तपासणीसाठी प्रकरणेही दाखल केलेली नाहीत.

प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आदींची बिंदूनामावली तपासणीची प्रकरणे मोठ्या संख्येने दाखल झाली होती. प्राधान्याने ही प्रकरणे वेळेत निकाली काढण्यात आली. जिल्हा परिषदा, सहकारी संस्था, पोलिस विभाग, महावितरण आदी विभागांच्या प्रकरणाही तपासणी पूर्ण झाली आहे. एसईबीसी व ईब्लूएसमुळे बिंदूनामावलीत बदल झाल्यामुळे पुन्हा पुन्हा बिंदूनामावलीची तपासणी करुन घ्यावी लागली आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांतच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे आता नियमित तपासण्या सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मागासवर्गीय कक्षाचे सहायक आयुक्त मुकेश काकडे यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.