मुजफ्फरनगर – निवडणूका जवळ आल्या असतानाच बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींना मोठा धक्का बसला आहे. आमदार मौलाना जमील यांनी बसपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महासचिव ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या उपस्थितीत जमील यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
मौलाना जमील यांनी म्हंटले कि, आगामी निवडणुकांमध्ये केवळ काँग्रेस पक्षच भाजपाला पराभूत करू शकते. म्हणून ते बसपामधून बाहेर पडले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बसपाने राजस्थानच्या पाचही जागांसाठी नावे घोषित केली आहेत. बसपा सर्व २५ जागा लढविणार आहे.