पुणे – कसबा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, या मतदारसंघात 5 मतदानकेंद्र संवेदनशील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दुपारी दोन या वेळेत या मतदार केंद्रांना भेट देणार आहेत.
मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 2 अब्दुल करीम हुसैन अत्तार कोर्टवाले ऊर्दू, पुणे मनपा शाळा क्र. 8, तळमजला कसबा पेठ, मतदान केंद्र क्र. 5 राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह, पुणे मनपा शाळा क्र. 6, मतदान केंद्र क्र. 10 राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह,
पुणे मनपा शाळा क्र. 6, मतदान केंद्र क्र. 77 सुंदराबाई राठी सेवासदन माध्यमीक प्रशाला तळ मजला रुम क्र. 1 सदाशिव पेठ व मतदान केंद्र क्र. 94 गोपाळ हायस्कूल, तळ मजला रुम क्र. 1, सदाशिव पेठ या केंद्रांचा समावेश आहे.
चिंचवडमध्ये वाहनतपासणी
पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके आणि पोलिसांकडून संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने विविध शक्यता गृहीत धरून खबरदारी घेतली जात आहे.