आळंदी, (वार्ताहर) – आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून खेड तालुक्यातील तमाम मुस्लीम समाजासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
खेड, चाकण, आळंदी येथील मुस्लीम समाजाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला तसाच निधी मरकळ मुस्लीम समाज यांना मिळण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आरीफ शेख आळंदी यांना समाजाच्या वतीने मागणी केली होती .
नंतर शेख यांच्या विशेष पाठपुराव्याने तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश कुर्हाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मरकळ समाज बांधवांसाठी निधी तरतूद करणेबाबत पत्र देण्यात आले.