नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी सोमवारी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून भावनिक ट्विट केले. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखा भाऊ लाभल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रियांका यांनी ट्विटरवरून देशवासीयांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतानाच राहुल यांच्या समवेतचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले. प्रत्येक सुख-दु:खात एकत्र राहताना मी माझ्या भावाकडून (राहुल) प्रेम, सत्य आणि धैर्याची साथ देण्याचे शिकले, असे प्रियांका यांनी म्हटले.
राहुल यांनीही स्वतंत्र ट्विट करताना देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनीही प्रियांका यांच्यासमवेतचे वेगळे छायाचित्र जारी केले. त्यामध्ये ते बंधू-भगिनी गळाभेट घेताना दिसतात.