देऊळगावराजे -येथे भाजप आणि इतर घटक पक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना दुधाने आंघोळ घालत सरकारचा निषेध करण्यात आला.
दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील देऊळगावराजे, वडगाव दरेकर, शिरापूर, हिंगणीबेर्डी, आलेगाव, बोरिबेल, काळेवाडी या गावातील शेतकरी, नागरिकांचा पुकारलेल्या दूध दर आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.
यावेळी सतीश कोल्हे, सतीश आवचर, अभिमन्यू गिरमकर, जनार्धन आवचर, गणेश माने, राजेंद्र गिरमकर, चेतन ओताडे, जालिंदर सूर्यवंशी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.