मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहचली. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या मोहक अंदाजाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच सोशल मीडियावर प्रियदर्शनी वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अशातच प्रियदर्शनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गुड न्यूज दिली आहे. नुकतंच प्रियदर्शनीचा वाढदिवस झाला असून तिने आपल्या वाढदिवसानिमित्त नवीन कार खरेदी केली आहे.
View this post on Instagram
सोशलवर प्रियदर्शनीने कार खरेदीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियदर्शनी आपल्या कुटूंबासोबत कारच्या शोरूममध्ये दिसत आहे. तिने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे.
अभिनेत्रीने कार घेतल्यामुळे सोशल मीडियावर ती तुफान चर्चेत आली आहे. सध्या तिचे चाहते तिचं पोस्टच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.
प्रियदर्शनीने कार खरेदी करतांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे,’२३ ऑगस्ट २०२३, माझ्या कुटुंबामध्ये नवीन सदस्याचे आगमन, वाढदिवसाला अनेकांनी विश केलं, “तुझी स्वप्न पूर्ण होवोत”… त्या सर्वांना ‘Thank you’! आणि माझ्यासोबत माझ्या आनंदात नाचणाऱ्या सर्वांचेही तितकेच अभिनंदन ! PS – या सगळ्या फोटोंमध्ये आनंद ओसांडुन वाहतोय पण Number 7… IS THE WINNER !” तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
दरम्यान सोशल मीडियावर प्रियदर्शनीचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. सोशलवर तिचे लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे. तिने हास्यजत्रेत तिने विविध पात्रं साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.