मुंबई – मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फैशन ‘क्विन’ म्हणून अभिनेत्री ‘प्रिया बापट’ला ओळखले जाते. अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. प्रिया सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रीय असते. तिने मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रिया सिटी ऑफ ड्रिम्सचा तिसरा सीझनमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अशात प्रियाने तिच्या आता पर्यंतच्या अभिनयातील अनुभव एका मुलाखतीत सांगितला आहे.
प्रियाने सुरुवातीला अगदी करिअरच्या सुरुवातीला ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटात काम केले. याचा चित्रपटात काम करतांनाचा अनुभवा तिने सांगितले की, ‘मुन्नाभाई MBBS’ या चित्रपटावेळी मी कॉलेजमध्ये होते. त्यावेळी मी बालकलाकार म्हणून काम करत होते. त्यामुळे शूटिंगसाठी पोहचल्यावर कोणाला कोणत्या नावाने हाक मारु हे कळतच नव्हते. तेव्हा मी राजू सरांना तुम्हाला अंकल म्हणू का, असे विचारले होते. त्यावर त्यांनी नको, तू मला राजू म्हण असे सांगितले होते.’
ते खूप चांगले आहे. एक दिग्दर्शक कलाकाराला घडवत असतो यावर माझा विश्वास आहे. माझा चेहऱ्यावरील मेकअप पाहून त्यांनी पहिल्याच दिवशी हा मेकअप का केलास, असे विचारले. आणि म्हटले की, चेहरा धुवून टाक. जसी आहेस तशी छान दिसतेय असे सांगितले. असे सांगून राजू सरांनी मला संवाद कसे बोलावेत याविषयी मार्गदर्शन केले होते. या चित्रपटातील एकाही सीनसाठी मी मेकअप केला नव्हता.’ असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे.