Namo Drone Didi Scheme । देश बदलत आहे, आता देशातील महिला तिच्या प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. अशात आता शेतकरी महिलांच्या हातात ड्रोन कॅमेराचा रिमोट दिसणार आहे. एवढेच नाही तर आता महिला शेतीला नवा आयाम मिळवून देण्याचे काम करणार आहे. ड्रोनच्या वापरामध्ये महिलांना पुढे आणणे आणि त्याद्वारे ग्रामीण महिलांना उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींनी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अनेक ग्रामीण महिला ड्रोन दीदी बनून चांगले उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली येथे नुकतेच सशक्त नारी विकास भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभरातील 10 ठिकाणांहून नमो ड्रोन दीदी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात ड्रोन दीदींना कृषी ड्रोनच्या ऑपरेशनबद्दल शिकवण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरातील नमो ड्रोन दीदींना 1000 ड्रोनही वाटप केले आहे. याच कार्यक्रमांतर्गत प्रयागराजमध्येही १०४ नमो दीदींना प्रशिक्षण देण्यात आले.
Namo Drone Didi Scheme । काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?
नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ड्रोनद्वारे पिकांवर लक्ष ठेवणे, कीटकनाशके व खतांची फवारणी करणे, बियाणे पेरणे आदी विविध शेतीविषयक कामांसाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Namo Drone Didi Scheme । नमो ड्रोन दीदीची निवड कशी केली जाते ते जाणून घ्या
– केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये ड्रोन दीदी योजना सुरू केली होती. ड्रोन दीदी योजनेअंतर्गत देशातील 15,000 पेक्षा जास्त महिला बचत गटांच्या सदस्यांना ड्रोन दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
– ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वयं-सहायता गटांच्या सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. यासोबतच महिलेने भारतीय नागरिक असणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 37 वर्षे दरम्यान असावे.
Namo Drone Didi Scheme । आर्थिक मदत मिळणार कशी
– ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जातील.
Namo Drone Didi Scheme । या कागदपत्रांची आवश्यकता असेल
पीएम ड्रोन दीदी योजनेचा लाभ फक्त बचत गटातील महिलांनाच मिळणार आहे. योजनेअंतर्गत निवडलेल्या महिलांना १५ दिवस ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. ड्रोन दीदी म्हणून काम करणाऱ्या महिलेला 15 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 10 ते 15 गावांचे क्लस्टर तयार करून महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे वेतन डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात वर्ग केले जाईल.
Namo Drone Didi Scheme । ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
-आधार कार्ड
-स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
-पॅन कार्ड
-फोन नंबर
-ई – मेल आयडी
-पासपोर्ट आकाराचा फोटो
-बचत गट ओळखपत्र
हे वाचले का ? काय सांगता..! व्हाईट ब्रेडपासूनही होऊ शकतो ‘कॅन्सर’