मुंबई – ‘जवान’ पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये तुफान कमाई करत आहे. चित्रपटाची बंपर ऍडव्हान्स बुकिंग झाली होती आणि आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत, त्यानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटात प्रेक्षकांना साऊथचा तडका, बॉलिवूडचा मसाला बघायला मिळतो आहे.
जवान सर्व भाषांमध्ये रिलीज झाला असून, सिनेमाने जगभरात दमदार कलेक्शन केलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवानने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सध्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस जबरदस्त ठरत आहे.
जिथे पहिल्या दिवशी चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 129 कोटींची कमाई केली. हा आकडा 235 ते 250 कोटींच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे किंग खानचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.
या चित्रपटामधील शाहरुखच्या विविध लूक्सनं अनेकांचे लक्ष वेधले. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकार ‘पृथ्वीक प्रतापनं’ नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पृथ्वीकनं शाहरुखच्या जवान या चित्रपटामधील लूकसारखा हुबेहूब लूक केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ ससोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकाऱ्यांनी देखील यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
जवान चित्रपटामधील एका सीनमध्ये शाहरुख हा मेट्रोमध्ये ‘बेकरार करके हमें यूँ न जाइये…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी किंग खानने टक्कल, डोळ्यावर गॉगल असा केला आहे. आता पृथ्वीक प्रतापनं देखील शाहरुख प्रमाणेच ‘बेकरार करके हमें यूँ न जाइये..’ या गाण्यावर डान्स केला आहे.
या व्हिडीओमध्ये तो टक्कल, डोळ्यावर गॉगल आणि लाल कलरचं जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला पृथ्वीकनं कॅप्शन दिलं, “जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय…’ असं लिहलं आहे.