पुणे: एक काळ असा होता की आई वडील आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. त्यासाठी ते नानाप्रयत्न करत होते आणि आजही करताना दिसत आहेत. परंतु आपल्या आई किंवा वडिलांसाठी मुलांनी स्थाळ शोधल्याचे क्वचितच पाहायला किंवा ऐकायला मिळते. सध्याच्या या डिजिटल वर्ल्डच्या दुनियेत काय होईल याचा नेम नाही. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारे अस्था वर्मा या मुलीचे ट्विट. या मुलीने तिच्या आईच्या लग्नासाठी स्थळ शोधण्यासाठी ट्विटरवर पोस्ट केली आहे.
Looking for a handsome 50 year old man for my mother! 🙂
Vegetarian, Non Drinker, Well Established. #Groomhunting pic.twitter.com/xNj0w8r8uq— Aastha Varma (@AasthaVarma) October 31, 2019
अस्थाने केलेल्या ट्विटर पोस्ट मध्ये काही अटी देखील घालण्यात आली आहेत. त्यामध्ये मुलगा निर्व्यसनी पाहिजे, शाकाहारी पाहिजे, आणि स्वतःच्या पायावर उभा असायला हवा या तीन अटींची परतात करणारे स्थळ हवे असल्याचे या मुलीने केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
Looking for a handsome 50 year old man for my mother! 🙂
Vegetarian, Non Drinker, Well Established. #Groomhunting pic.twitter.com/xNj0w8r8uq— Aastha Varma (@AasthaVarma) October 31, 2019
दरम्यान आपल्या आईच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे सर्वच स्थरांतून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
अस्थाने तिचा आणि तिच्या आईचा फोटो शेअर करत ‘माझ्या आईसाठी मी ५० वर्षांच्या आसपास नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. मुलगा शाकाहरी आणि निर्व्यसनी असावा’ अशी अट घातल तिने ट्विट केले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तुम्हाला चांगला मुलगा मिळवून देण्यासाठी मी हे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेऊ का?, तु खूप चांगले काम करत आहे असे म्हणत लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.