Global Leader Approval Rating : मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्चस्व कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.पंतप्रधान मोदी हे जगातील 22 लोकप्रिय नेत्यांच्या यादीत 76 टक्के मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या रेटिंगमध्ये 66 टक्के मान्यता रेटिंगसह मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
NEW: Global Leader Approval: *Among all adults
Modi: 76%
López Obrador: 66%
Lula da Silva: 49%
Albanese: 47%
Meloni: 41%
Biden: 37%
Sánchez: 37%
Trudeau: 31%
Sunak: 25%
Macron: 24%
Scholz: 21%*Updated 12/7/23https://t.co/Qxc6HbLPz4 pic.twitter.com/IK0niZPdso
— Morning Consult (@MorningConsult) December 8, 2023
तर तिसर्या क्रमांकावर असलेले स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बुर्सेट यांना ५८ टक्के मान्यता मिळाली आहे. तसेच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना चौथ्या क्रमांकावर ४९ टक्के रेटिंग मिळाले आहे. पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ४७ टक्के रेटिंगसह आहेत.
इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 41 टक्क्यांसह ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. सातव्या क्रमांकावर असलेले बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो यांना ३७ टक्के रेटिंग मिळाले आहे. त्याचवेळी आठव्या क्रमांकावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि नवव्या क्रमांकावर आलेले स्पेनचे पेड्रो सांचेझ यांनाही ३७ टक्के रेटिंग मिळाले आहे.
रेटिंगमध्ये, आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर हे 36 टक्के मान्यता रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहेत. वराडकरांनंतर स्वीडनचा उल्फ क्रिस्टरसन आणि नंतर पोलंडचा मार्सिन्किविझ आहे. त्यानंतर 13व्या क्रमांकावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 31 टक्के रेटिंग मिळाले आहे. याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 17 व्या क्रमांकावर असून त्यांना 25 टक्के रेटिंग मिळाली आहे.