वलसाड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या वलसाड येथून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा श्रीगणेशा आज केला आणि ‘ये गुजरात हमने बनाया है’ अशी नवी घोषणा यावेळी केली. तसेच आपला गुजरात विजयाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आपल्याला मदत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अगोदर कापराडा येथे सभा झाल्यानंतर वलसाड येथे दाखल झाल्यावर त्यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच ते जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा जेवढ्या जागा जिंकून भाजप सत्तेवर येत होती त्यापेक्षा जास्त जागा यावेळी भुपेंद्र पटेल यांना जिंकून देण्याचे आवाहन केले. भुपेंद्र यांचा रेकॉर्ड माझ्यापेक्षा भारी असला पाहिजे.
Massive support for the BJP across Gujarat. Watch from Kaprada. https://t.co/B9tPOyZQwT
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2022
आज आदिवासी भागात रूग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये आहेत. गुजरातला गुजरात बनवण्यासाठी प्रत्येक गुजराथी व्यक्तीने कष्ट घेतले आहेत. आपला घाम गाळला आहे, रक्त सांडले आहे. त्यामुळेच प्रत्येक गुजराथी नागरिकांत आत्मविश्वास भरला आहे. त्यामुळेच ते म्हणतात आणि त्यांच्या आतून आवाज येतो की हे राज्य आम्ही बनवले आहे.
देशाच्या विकासासाठी गुजरातच्या विकासाच्या भावनेने आपण सातत्याने काम करतो आहोत. ही निवडणूक भुपेंद्र किंवा नरेंद्र लढवत नसून गुजरातमधील प्रत्येक बंधु आणि भगिनी लढवत असल्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.