गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा शौर्यपीठ तुळापुर २०२०” च्या तयारीची प्राथमिक नियोजन व आढावा बैठक श्री शिवाजी व्यायाम मंडळ, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. या सोहळ्याचे हे 7 वे वर्ष असुन राज्यभरातुन शंभुप्रेमी 16 जानेवारी ला संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी ऊपस्थित असतात.
बैठकीमध्ये सोहळ्याची पार्श्वभूमी आणि भविष्यातील संकल्पना सांगण्यात आल्या. तसेच सोहळ्यासाठीचे प्रमुख पाहुणे, उपस्थिती, पुरस्कारार्थी याबाबत चर्चा करुन उपस्थितांकडून नावे घेण्यात आली.
तसेच कार्यक्रमासाठीच्या स्टेज, मंडप, पालखी, सजावट, मिरवणूक, विशेषांक, कार्यक्रम पत्रिका, झेंडे, पाणी, जेवण आणि इतर बाबींच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले. २०२० चा श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात होणार करण्याचा संकल्प करण्यात आला.या बरोबरच संभाजी ब्रिगेड च्या राज्यव्यापी सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी बैठकीसाठी शांताराम कुंजीर, मुख्य समन्वयक – मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेङ, हर्षवर्धन मगदुम- पुणे शहराध्यक्ष, प्रदिप कणसे, अनिल माने, प्रशांत धुमाळ, सुधीर पुंडे, संतोष (आण्णा) शिंदे, एस एम (आण्णा ) पोरे, अजित कार्ले, कैलास कणसे सह इतर असंख्य शंभुप्रेमी ऊपस्थित होते.