पारगाव शिंगवे-भराडी (ता. आंबेगाव) येथील ग्रांमपंचायतीच्या सरपंचपदी प्रमिला मच्छिंद्र खिलारी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच प्रमिला खिलारी यांचा सत्कार तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी, माजी उपाध्यक्ष नाथा पाटील घेवडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पोलिस पाटील संतोष खिलारी व सोसायटीचे अध्यक्ष रमेश खिलारी, उपसरपंच देवीदास खिलारी, काताराम खिलारी, मनोहर अरगडे, बाळासाहेब खिलारी, सिताराम जांभळे, प्रदीप लोंढे, मगन गावडे, दत्तात्रय जांभळे, भाऊसाहेब गावडे, शिवाजी खिलारी, प्रवीण खिलारी वैभव खिलारी, वसंत खिलारी, शिवाजी गावडे, विजय खिलारी आदी यावेळी उपस्थित होते.