मुंबई – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रानबाजार या वेब सिरीजमुळे प्राजक्ता माळी एका नव्या रूपात सगळ्यांसमोर आली होती. प्राजक्ताचा नवा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला होता. अनेकांनी तिच्या अभिनयाचे कौतुक देखील केले होते. प्राजक्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. सध्या ती तिच्या अशाच एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळीने स्वतःचेच एक मिम शेअर केले आहे. ज्याच्यावर तिच्या फॅन्सने अक्षरशः कमेंटचा पाऊस पाडला आहे. हे मिम पाहून तिच्या फॅनसह ट्रॉलर्सलादेखील हसू अनावर झाले आहे. प्राजक्ता माळीने आपल्या इस्टाग्रामवरून एक मिमच फोटो शेअर केलाय ज्यामध्ये तिचेच २ फोटो आहेत. एका फोटोसमोर ‘पुण्यात असताना ती’ तर ;दुसऱ्या फोटोसमोर गावाकडं आल्यावर ती’ असे कॅप्शन लिहिले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी हे मिम चांगले शेअर करत व्हायरल केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी एकटीच का ? तुम्हीही आनंद घ्या” असे कॅप्शन देऊन प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केली आहे. यापूर्वीही प्राजक्ताचे अनेक मिम व्हायरल झाले होते. या मिमवरील कमेंट देखील वाचण्यासारख्या आहेत. जाताना दळण घेऊन जा, मग गावाकडं कधी येणार अशा कमेंट यावर केल्याचे पाहायला मिळते.