संत सावता माळी संघाचे काम स्तुत्य: फुलसौंदर

नगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळातही श्री संत सावता माळी युवक संघाचे सुरु असलेले काम समाजासाठी आदर्शवत आहे. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संघ करत असलेले कामातून इतरांनाही प्रेरणा मिळत आहे. आज करोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सोडविण्यासाठी संघ घेत असलेला पुढाकार असाच पुढे सुरु ठेवावा असे, प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी अळकुटी येथील नितीन परंडवाल यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र फुलसौंदर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, डॉ.सुदर्शन गोरे, शरद कोके, लवेश गोंधळे, दीपक साखरे, पंकज दळवी, आकाश परंडवाल, सचिन परंडवाल, मच्छिंद्र बनकर, कुशल शेलार, वैभव शेलार, सुयश नगरे, पियुष नगरे आदी उपस्थित होते.

यावेळी अशोक तुपे म्हणाले, चांगल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे श्री संत सावता माळी युवक संघाचे कार्य जिल्ह्यात विस्तारत असून, ते आणखी व्यापक करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड करुन त्यांच्यातील सामाजिक कार्याला बळ देण्याचा प्रयत्न संघाच्यावतीने सुरु आहे. पारनेर तालुक्‍यात नितीन परंडवाल यांचे काम चांगल्यापद्धतीने सुरु होते. त्यांचे कार्य अधिक व्यापक होण्यासाठी त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करत आहोत. या पदाला न्याय देतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी परंडवाल म्हणाले, श्री संत सावता माळी युवक संघाच्या चांगल्या कामामुळे आपण त्यांच्याशी जोडलो गेलो. त्यातून युवक, महिलांचे प्रश्‍न सोडविले, तसेच संघाच्या कार्यात अनेकजण जोडले. आपल्या समर्थ कॉम्प्युटेक माध्यमातून समाजासाठी उपयोग व्हावा, या दृष्टीने युवकांचे मोफत ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म, नोकरी विषयक अर्ज, अनुदान, 10 व 12 वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे उपक्रम संघाच्या माध्यमातून राबविले. प्रास्तविक डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले. तर दीपक साखरे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.