मुंबई – पौराणिक कथांपासून ऍक्शन मनोरंजन आणि रोम-कॉमपासून सायन्स फिक्शन पर्यंत भारतीय सुपरस्टार ‘प्रभास’ने प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे नवनवीन प्रयत्न करत स्वःतला सिद्ध केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली आहे. आणि त्यामुळेच प्रभासने एक नवे शिखर गाठले असून, तो लवकरच आपल्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास सोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ दिसणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित असून, या चित्रपटाचे डायरेक्शन ओम राऊत करणार आहेत.
दरम्यान, बाहुबली फेम प्रभास 43 वर्षाचा असून चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. प्रभास कधी लग्न करणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो. नुकतीच प्रभासनं नंदमुरी बालकृष्ण यांच्या अनस्टॉपेबल 2 मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये प्रभासला विविध प्रश्न विचारण्यात आले होते. यावर त्याने भन्नाट उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
गेल्या काही दिवसांत प्रभासचं नाव अभिनेत्री ‘क्रिती सेनन’शी जोडलं गेलं होत. हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत, अशी जोरदार चर्चा देखील होती. मात्र क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता खुद्द प्रभासनेच त्याच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.
काय म्हणाला प्रभास….
अनस्टॉपेबल 2 च्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये दिसते की नंदमुरी हे प्रभासला लग्नाबद्दल विचारतात. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर प्रभासने स्मार्ट पद्धतीने दिलं ‘सलमान खाननं लग्न केल्यानंतर मी लग्न करेन’ हे ऐकल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित असणारे लोक खळखळून हसतात.