‘या’ कारणासाठी उभारलं प्रभासचं 60 फुटी कट आऊट!

हैद्राबाद- अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ऍक्‍शन पॅक ‘साहो’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ऑफिशल टिझर रिलीज करण्यात आलं होता. ऍक्‍शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला होता. चित्रपटाच्या दमदार टिझर मुळे आता फॅन्स देखील भलतेच एक्‍साईट झाले आहेत.

दरम्यान, रविवारी (18 ऑगस्ट) हैद्राबाद मधील ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये साहोचं प्रि रिलीज फंक्शन होतं. यात सिनेमाच्या टीमसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचं खास आकर्षण होतं ते म्हणजे अभिनेता प्रभासचं 60 फुटी कट आऊट! यावेळी प्रभासच्या या कट आऊटने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.