पूर्वीच्या तुलनेत विजेची समस्या कमी झाली असली, तरी अजूनही लोक त्यांच्या घरांना इनव्हर्टरद्वारे किंवा पॉवर बॅकअपसाठी इतर पर्यायी माध्यमातून वीज पुरवतात. Blackview ने अशीच एक पॉवर बँक लॉन्च केली आहे, जी पॉवर ग्रिडपेक्षा कमी नाही. या पॉवर बँकेची खास गोष्ट म्हणजे ती पोर्टेबल आहे, म्हणजेच तुम्ही ती तुमच्यासोबत कुठेही नेऊ शकता. याची सूटकेस ट्रॉलीसारखे डिझाइन केले आहे आणि त्याला चाके देखील आहेत.
ही पॉवर बँक विशेषतः कॅम्पिंग करणाऱ्यांसाठी आहे. Blackview OSCAL PowerMax 3600 मध्ये एकूण 15 बॅटरी पॅक आहेत, ज्याद्वारे त्याची क्षमता 3.6 kWh वरून 57.6 kWh पर्यंत वाढवता येते. याला पॉवर बँक जरी म्हणत असले तरी याचा वापर एखाद्या जनरेटरप्रमाणे चांगल्याने पद्धतीने केला जाऊ शकत. कंपनीचा दावा आहे की बॅटरी वाढवल्यानंतर ती 30 दिवसांसाठी होम बॅकअप पॉवर म्हणून वापरली जाऊ शकते. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत ही पॉवर बँक वापरता येते.
पूर्ण चार्ज 1.2 तासांत होईल
कंपनीचा दावा आहे की ही पॉवर बँक रॅपिड चार्जिंग फीचरसह येते. त्याची चार्जिंग गती 3600W आहे, जी केवळ 1.2 तासांत 15 बॅटरी पॅक पूर्णपणे चार्ज करते. एवढेच नाही तर या पॉवर बँकेच्या माध्यमातून तुम्ही केवळ स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सच चार्ज करणार नाही तर त्यावर हाय पॉवर होम अप्लायन्सेसही चार्ज करता येतील. या पॉवर बँकमध्ये एकूण 14 आउटपुट पोर्ट आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे गॅजेट्स आणि घरगुती उपकरणे कनेक्ट करू शकता.
25 वर्षे बॅटरी खराब होणार नाही
ब्लॅकव्यूचा दावा आहे की, या पॉवर बँकमध्ये लावलेली बॅटरी २५ वर्षे खराब होणार नाही. त्याच्या तांत्रिक वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर ते T1 चिप सह येते. यात एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यावर तुम्ही इनपुट आणि आउटपुट पॉवर पाहू शकता. याशिवाय रिमोट कंट्रोलनेही ऑपरेट करता येते. ही पॉवर बँक चार्ज करण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतात. ही पॉवर बँक तुम्ही सोलर पॉवर, कार, जनरेटर, एसी पॉवर सप्लायद्वारे चार्ज करू शकता. या पॉवर बँकेची किंमत $1799 म्हणजेच अंदाजे 1.49 लाख रुपये आहे.