बॉलिवूडचा शानदार अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच चाहत्यांमध्ये भेटीला येणार आहे . OMG 2 च्या यशानंतर, स्टार OTT वर त्याच्या तिसऱ्या चित्रपटासह परतला आहे. नुकतेच Zee5 ने पंकज त्रिपाठीच्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. कडक सिंह असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपट निर्माते अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट यावर्षी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
पंकज त्रिपाठी लवकरच ZEE5 वर कडक सिंह या चित्रपटात दिसणार आहे. आज निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून ही माहिती दिली आहे. चित्रपटाचे पोस्टर अतिशय प्रेक्षणीय आहे ज्यामध्ये पंकज त्रिपाठीचे दोन चेहरे दिसतात, आणि त्यांच्यामध्ये एक रेषा आहे. ज्यामध्ये एक माणूस पडताना दिसत आहे.
कडक सिंग ही एका पात्राची कथा आहे जो आपल्या आठवणी विसरतो आणि भूतकाळातील कथा उलगडतो. तो त्याच्या भूतकाळात आणि वर्तमानात अडकून राहतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, कडक सिंह यावर्षी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठीसोबत संजना सांघी, जया अहसान देखील दिसणार आहेत.