आग्रा – “माय स्टॅम्प’ अभियानांतर्गत विवेकसिंह बघेल यांच्यावरील टपाल तिकीट 17 ऑगस्ट रोजी प्रकाशित केले गेले. असाधारण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाच्या वतीने “माय स्टॅम्प’ अभियानांतर्गत टपाल तिकीट प्रसिद्ध केले जाते.
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यानुसार गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावरील टपाल तिकीटही प्रसिद्ध केले गेले होते. 9 फेब्रुवारी 2011 रोजी जागतिक टपाल तिकीट प्रदर्शनामध्ये “अहिल्या रत्न’ विश्व शांती दूत डॉ. सुधीर तारे यांच्यावरील टपाल तिकिटाचेही अनावरण करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील रहिवासी विवेकसिंह बघेल हे समाजसेवेत निरंतर सक्रिय असलेली व्यक्ती आहेत. बघेल यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध होण्यामुळे उत्तर प्रदेशात आनंद साजरा होतो आहे. समाजाच्या सर्व स्तरांमधून बघेल यांचे अभिनंदन होत आहे.