पुणे – पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेसाठी नवीन विद्यार्थी व नूतनीकरणाचे विद्यार्थी या सर्वांना अर्ज करता येणार आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. शिष्यवृत्तीसाठी 47 हजार 575 संच निर्धारित केले आहेत.
पात्र विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार युजर आयडी तयार करून अर्ज सादर करावे लागणार आहेत. आवश्यक सूचना, पात्रतेने नियम व अटी संबंधित लिंकवर उपलब्ध आहेत.
योजना राज्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्राचार्य, विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा बैठका, शिबिर घेण्यात यावेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी लागणार आहे.
एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी हरिविजय शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत.