पुणे – केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. या अर्जांची पडताळणी करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.
सद्य:स्थितीत महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये पडताळणीसाठी अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी अर्ज आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून विना विलंब योग्य ती कार्यवाही करून अंतिम मुदतीपर्यंत पुढील टप्प्यावर पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
करोना प्रादुर्भावामुळे 2020-21 साठी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी 50 टक्के मार्कांचे निकष शिथील केले आहेत.
शिष्यवृत्तीसाठी पात्र नवीन मंजुरी व नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याबाबत तत्काळ सूचना देवून पात्रतेबाबतच्या नियमावलीची माहिती एसएमएस किंवा सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे पाठविणे आवश्यक आहे. अद्यापही काही महाविद्यालयांनी पोर्टलवर पुन्हा नोंदणी केलेली नाही. त्यांनी नोंदणी केली पाहिजे.