उरुळी कांचन, (वार्ताहर)- योगासने करण्याच्या बहाण्याने घराशेजारी राहणार्या एका कथित शिक्षकाने 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उरुळी कांचन परिसरात मंगळवारी (दि. 7) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भज्जूलाल रायकवार काका (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय पिडीत मुलीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून ती सुट्टीकरीता तिच्या आई व वडिलांकडे राहायला आली होती.
मंगळवारी दुपारी मुलीचे आई वडील कामाला गेले होते. तर भाऊ शेजारी फोनवर बोलत होता. यावेळी शेजारी राहणारे भज्जूलाल रायकवार काका हे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या घरी आले होते. यावेळी रायकवार याने विचाराले की तुला योगासने येतात का? यावेळी मुलीने मोजकेच येत असल्याची माहिती रायकवार यांना दिली.
यावेळी त्यांनी काही योगासनाचे प्रकार शिकवले. कागद दिले व तो राहत असलेल्या घरी येण्यासाठी सांगितले. घरी गेल्यानंतर आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत पिडीत मुलीने बहीण व मावस बहीण यांना जोरात आवाज दिला. घडलेली घटना सांगितली. बहीणींनी त्या काकाला मारहाण केली. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कथित योगा शिक्षक भज्जूलाल काका याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.