वॉशिंग्टन : आर्थिक मंदीने पाकिस्तानचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. एवढे असूनही पाकिस्तनाची मुजोरी काही केल्या कमी झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये पाकिस्तानने स्वत:चीच पोलखोल केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मीरमधील बदलत्या वातावरणाविषयी याठिकाणी चर्चा करण्यात येत होती. मात्र याठिकाणी असणाऱ्या पाकिस्तनाच्या अधिकाऱ्यांना ही स्तुती काही रुचली नाही आणि त्यांनी या विषयवार बोलणाऱ्या वक्त्यांना धक्के मारून कार्यक्रम स्थळावरून बाहेर हाकलून दिले.
वॉशिंग्टन डीसीमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर पीस स्टडीजने ‘काश्मीर -अशांततेपासून परिवर्तनाकडे’ या विषयावर पॅनल डिस्कशनचे आयोजन केले.यावेळी काश्मीरमध्ये राहणाऱ्या काही लोकांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पॅनेलमध्ये जम्मू काश्मीर वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष मीर जुनैद आणि जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला नगरपरिषदेचे अध्यक्ष तौसीफ रैना यांचाही समावेश होता. मीर बोलत असताना आपल्या भाषणात त्यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून होत असलेल्या विकासकामांचे आणि चांगल्या बदलांचे कौतुक करण्यास सुरुवात केली. हि स्तुती त्यांना काही आवडली नाही आणि त्यांनी उभे राहून गोंधळ घातला.
याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती काश्मीरच्या स्तुती सुरु असताना खूप चिडलेला दिसत आहे. काही लोक त्याला बाहेर ढकलत आहेत. या दरम्यान पाकिस्तानी ओरडत आहेत की भाषण स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. पाकिस्तानी व्यक्तीच्या या कृतीवर काश्मीरच्या वक्त्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली.
व्हिडिओमध्ये तो वक्ता “देव तुम्हाला सदबुद्धी देवो, आज तुमचा खरा चेहरा संपूर्ण प्रेक्षकांनी पाहिला. आम्ही काश्मीरमध्ये जे पाहिले, आणि आज वॉशिंग्टनमध्ये जे पाहिले यावरून आम्हाला कळले कि हे लोक किती क्रूर आहेत हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. काश्मीरच्या विध्वंसामागे तुमच्यासारखेच लोक आहेत. एवढेच नाही तर हेच लोक जम्मू-काश्मीरचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे त्यांनी म्हटले.