भिगवण-भिगवण आणि परिसरात साथीच्या रोगाच्या तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 4) एका अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. तसेच तीन व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात वागल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारु विक्री प्रकरणी अंकुश भगवान गाडे (रा. भिगवण ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न लावता अनावश्यक फिरतात या करणास्तव दत्तात्रय पांडुरंग वाकडे (वय 34, रा. वाकडेवस्ती, निरगुडे ता. इंदापूर,) झनु भैय्यालाल यादव (वय 30 मुळ रा. पौडी, ता. व्होहारी, जि. साडोल, राज्य मध्यप्रदेश) दिगंत राधाकांत चिन्ना (वय 30, मुळ रा. कुबेरा, ता. तिहेरी, जि. बद्रक, राज्य ओडीसा, दोघेही सध्या रा. अकोले, ता इंदापूर) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश भगवान गाडे हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लघन करून श्री शंभुराजे चायनीजचे पाठीमागे भींतीचे आडोशास बेकायदा दारु विक्री करीत होता. त्याच्याकडे 15 सीलबंद मद्य बाटल्या व रोख रक्कम असा एकूण 3460 रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आहे. परंतू गाडे हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.