पुणे – १८९ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्स ज्वेलरी ब्रँडतर्फे महाराष्ट्रातील लग्नसराईच्या काळासाठी प्रथा कलेक्शन सादर करण्यात आले आहे. प्रथा कलेक्शनमध्ये भरजरी, नेकलेसेस, चोकर्स, आकर्षक हिर्यांचे दागिने, ईअर रिंग्स, रिंग्स, कडा इत्यादींचा समावेश असून आधुनिक काळातील नववधूंची आवड लक्षात घेऊन या दागिन्यांचे डिझाईन करण्यात आले आहे. साखरपुडा, हळदी समारंभ, संगीत, लग्न आणि स्वागत समारंभ अशा लग्नसराईशी संबंधित सर्व प्रसंगांसाठी प्रथा कलेक्शनमध्ये आकर्षक व कलात्मक सोन्याचे दागिने आहेत. या कलेक्शनचे अनावरण लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते पीएनजी ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड येथील दालनात करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना तेजस्विनी पंडित म्हणाल्या की, पीएनजी ज्वेलर्सची दागिने बनविण्याची कला अद्वितीय आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नववधूंसाठी प्रत्येक वर्षी नव्याने अप्रतिम, सर्वोत्कृष्ट दागिने तयार करणे ही एक अनोखी बाब आहे. आज दालनात मी काही दागिने परिधान करून बघितले आणि खरोखरच त्या दागिन्यांचे सौंदर्य पाहून मीच थक्क झाले आहे.
याप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, आजच्या युवा पिढीतील जोडप्यांना परंपरांशी जोडून राहत आधुनिक विचार व्यक्त करायचे आहेत. त्यांना आजच्या काळातील फॅशन आणि शैलीच्या माध्यमातून व्यक्त व्हायचे असते. २०२२ मधील लग्नसराईच्या काळासाठी आमचे प्रथा कलेक्शन आपल्या वर्तमानाला सुवर्ण भूतकाळाशी जोडते. या कलेक्शनद्वारे आपल्या समृद्ध परंपरा व नात्यातील दृढता, प्रेम जपण्याचा प्रयत्न केला आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना हा भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये जपत आलेल्या परांपरांना अनुसरून असा बनविला आहे. नववधू आपल्या विवाह पेहरावाला सुसंगत आणि आपल्या आवश्यकतानुसार विविध शैलीतील दागिन्यांची निवड करू शकतात.
प्रथा कलेक्शन हे महाराष्ट्र व गोवा येथील पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये उपलब्ध असेल.
या आधीच्या संग्रहांमध्ये पैठणी साड्यांनी प्रेरित डिझाइन्सची सुंदर श्रेणी नक्षी समाविष्ट होती, तर कथा हा त्या काळातील साच्यांचा वापर करून १०० वर्षे जुन्या दागिन्यांच्या डिझाइनला पुनरुज्जीवित करणारा संग्रह होता. दरवर्षी, लग्नसराईचा काळ खास बनवण्यासाठी, पीएनजी ज्वेलर्स असे संग्रह सादर करतात जे प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि पारंपरिक दागिन्यांच्या कला प्रकारांना पुनरुज्जीवित करण्यात मदत करतात.