पीएमसी बॅंकेच्या ताणाचा पाचवा बळी

सोलापुरातील महिलेचा मृत्यू; कन्या आणि जावयाच्या ठेवींच्या चितेंने हृदयविकाराचा झटका
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या निर्बंधाने आणखी एक म्हणजे बळी घेतला. यावेळी सोलापुरात राहणाऱ्या 73 वर्षीय महिलेचा जीव गेला. या बॅंकेत खाते असणाऱ्या मुलीशी बोलल्यानंतर भारती सदारंगानी यंचा रविवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला.

भारती सदारांगानी

सदारंगानी यांचे जावई चंदन चोत्राणी आणि कन्या हेमा या दोघांचीही या बॅकेत खाती होती. त्यात जवळपास 2.25 कोटी रुपये आहेत. चंदन चोत्राणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अपल्या मुलीची आयुष्यभराची सारी कमाई या बॅंकेत ठेवीत अडकल्याने सदारंगानी या कमालीच्या तणावाखाली होत्या. आम्हाला त्या रोज फोन करत. माझी पत्नी हेमा तिला वाटणारी चिंता आईशी शेअर करत असे. त्यामुळे त्या खूप तणावा खाली होत्या. सदारंगानी यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती यांना हृदयविकाराचा कोणताही त्रास यापुर्वी झालेला नव्हता. त्यांच्या वैद्यकीय इतिहासावरून असे काही घडेल असे वाटले नव्हते.

मुलुंडमध्ये राहणारे चोत्राणी म्हणाले, बॅकेवर निर्बंध घालण्यापुर्वी दोन दिवस मी विमानचे आंतरराष्ट्रीय तिकिट बुक केले होते. बॅंकेत पैसे अडकल्याने आम्हाला दैनंदिन खर्चासाठीही पैसे इतरांकडून घ्यावे लागत आहेत.
भारतीय नॅशनल कॉंगेसनेही ट्विट करून पीएमसी पेचप्रसंगावर सरकार करत असलेल दुर्लक्षावर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.