आता मोटोरोलाही करणार फोल्डेबल फोन लाँच

नवी दिल्ली: एकेकाळी बाजारात वर्चस्व असलेली मोटोरोला कंपनी पुन्हा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंग प्रमाणाचे मोटोरोलाही एक फोल्डेबल फोन लाँच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोटोरोला कंपनीने १३ नोव्हेंबर ला एक मोठा इव्हेंट आयोजित केला असून या इव्हेंट मध्ये हा फोने लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटसाठी माध्यमांना आमंत्रणेही पाठवण्यास सुरवात झाली आहे.

१३ नोव्हेंबरला कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस मध्ये हा इव्हेंट पार पडणार असून, याच कार्यक्रमात मोटोरोला कंपनी आपला पहिला फोल्डेबल फोने लाँच करणार आहे. हा फोन कंपनी Razr 2019 या नावाने लाँच करू शकते अशी चर्चा आहे.

मोटोरोलाचे उपाध्यक्ष (ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन डेरी यांनी आपली कंपनी लवकरच एक फोल्डेबल फोने लाँचयह करणार असल्यासंदर्भात भाकीत व्यक्त केलं होत.न परंतु त्याबदडवल अधिक माहिती दिली नव्हती. परंतु नुकतंच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की कंपनीने खूप पूर्वीच फोल्डेबल फोनवर काम करण्यास सुरवात केली होती. यासह, त्यांनी सांगितले की मोटोरोला सॅमसंग आणि हुआवेच्या स्टाइलपेक्षा वेगळा फोल्डेबर फोन लाँच करणार आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी एका अहवालात असे म्हटले गेले होते की, Razr 2019 डिसेंबर २०१९ किंवा जानेवारी २०२० मध्ये युरोपियन बाजारात उपलब्ध केला जाईल. याची किंमत 1,500 युरो (सुमारे १,१९,००० रुपये) असू शकते. फोनच्या अनेक डिझाइनही लीक झाल्या आहेत. या लीक्सनुसार, नवीन मोटो Razr डिझाइनच्या बाबतीत जुन्या मोटो Razr पासून प्रेरित असल्याचे मानले जाते.

दरम्यान ईव्हीएम मशीन संशयाच्या भोवऱ्यात असल्याने जवळपास सर्वच पक्षांकडून बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाने हि विनंती फेटाळून लावत ईव्हीएम मशीन हॅक करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केलं होत. तसेच ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार होऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या ३ किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.