‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवरून गायब 

मुंबई – निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असणारा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटला लोकसभा निवडणुका संपेपर्यंत स्थगिती दिली आहे. जर लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट प्रदर्शित झाला. तर, त्याचा पक्षाला मोठा फायदा होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग पावण्याची शक्यता असल्याने हा चित्रपट प्रदर्शित करू नये असं निवडणूक आयोगाने म्हंटलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या चित्रपटाला सध्या तरी स्थगिती दिली आहे.

दरम्यान, आता चित्रपटाला स्थगिती दिल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ ट्रेलर असं युट्यूबवर सर्च केल्यावर व्हिडिओ उपलब्ध नाही असा मजकूर दिसतो. त्यामुळे, निवडणूक आयोगाने प्रदर्शनावर दिलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे हा ट्रेलर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.