नवी दिल्ली – कोविड-19 वरील संशोधन आणि लसीचा पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसंस्था, चाचणी तंत्र, संपर्क मागोवा, औषधे आणि उपचार यासंदर्भात आज एक आढावा बैठक घेतली.
कोविड-19 आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय लस विकासक आणि उत्पादकांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि अशा सर्व प्रयत्नांना सरकारी सुविधा आणि पाठिंबा असाच सुरू राहिल, अशी कटीबद्धता व्यक्त केली.
आरोग्य मंत्रालयाच्या लसींसाठी व्यापक वितरण यंत्रणेचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. यात पुरेशी खरेदी, मोठ्या प्रमाणात साठा करण्यासाठी तंत्रज्ञान, वितरण आणि प्रभावी पद्धतीने देयता सुनिश्चित करण्यासाठी छोट्या बाटल्यांमध्ये लस भरणे या उपायांचा समावेश आहे.
याशिवाय सिरो-सर्वेक्षण आणि चाचण्या वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. नियमित, वेगवान आणि स्वस्त खर्चात चाचणीची सुविधा सर्वांना लवकरात लवकर उपलब्ध व्हायला हवी.
पारंपरिक औषधोपचारांच्या सातत्यपूर्ण आणि कठोर वैज्ञानिक चाचणी आणि प्रमाणीकरणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी या कठीण काळात आयुष मंत्रालयाच्या खात्रीचा उपाय करण्याच्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले.
केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगासाठी चाचणी, लस आणि औषधे यासाठी कमी खर्च, सहज उपलब्धता आणि उपाय पुरवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार त्यांनी केला. संक्रमणाविरोधात नियमित दक्षता आणि उच्च तयारीची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.