वाघोली – भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बकोरी तालुका हवेली येथे भाजप च्या वतीने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
वनमित्र चंद्रकांत वारघडे, व महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य गणेश कुटे मित्रपरिवार यांच्या वतीने 250 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, हवेली तालुका भाजप अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील, वनमित्र चंद्रकांत वारघडे, स्नेहल कुलकर्णी, विद्या पाटील, नरेंद्र पाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे, उमेश मोरे, विशाल हरगुडे, केतन जाधव, गणेश सातव, विजय जाचक, अक्षय कुटे, विशाल कुटे, अविनाश कुटे,तुषार कुटे, अजित कुटे,अमोल कुटे, अविनाश कंद, संदीप कोलते, दिपक गाडूते, प्रदीप सातव आदी मान्यवर उपस्थित होते.