औरंगाबाद – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी मोदी यांचा आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला सर्वाधिक आवडतो. असं प्रतिपादन प्रीतम मुंडे यांनी केल आहे.
याबाबत एका मराठी वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, मुंडे कार्यक्रमावेळी म्हणाल्या, “गेल्या ७ वर्षांत मोदींनी कधीच पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांच्यावर यावरून टीका ही झाली मात्र , जो माणूस आपलं काम करतो, तो आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो. मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण हाच आहे.’
त्या पुढे म्हणाल्या काम करणाऱ्या व्यक्तीवर १० जण चांगलं बोलणारे तर २ जण टीका करणारे असतात. आपण टीका करणाऱ्यांकडे लक्ष न देता नेहमीच आपलं काम करत राहणं महत्त्वाचं असत.’ असं त्या म्हणाल्या.