पिंपरी – नवीन फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये दिले तरी पैशांसाठी छळ कमी झाला नाही. अखेर सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या 21 वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोनिका ए बिल्डिंग, पिंपरी येथे 8 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ही घटना घडली.
भाग्यश्री ऋषभ बुंधलवार (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या आईने याप्रकरणी शनिवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ऋषभ राजेश बंधुलवार (वय 27), महिला आरोपी (वय 50, दोघेही रा. रा. भैरवनाथनगर रोड, मोनिका ए बिल्डिंग, पिंपरी), विवाहितेचा मोठा चुलत दीर मम्मू (वय 30, रा. दिघीगाव), महिला आरोपी (वय 28, रा. दिघीगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
भाग्यश्री हिच्याकडे आरोपींनी नवीन फ्लॅट घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील पाच लाख रुपये आरोपींना दिले. तरीही उरलेले पैसे आणण्यासाठी आरोपींनी तगादा लावला. तसेच विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. उसललेले पैसे माहेरून आणता येत नसतील तर कोठेतरी जाऊन जीव दे, असे म्हणून आरोपींनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पीडित विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.