पिंपरी – व्हाट्स ऍपवर महिलांचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.18) सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवड येथील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी जॅक, करण, बबलु (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल कामिनी येथे एक इसम जॅक हे नाव वापरुन व्हॉट्सप वरुन वेगवेगळ्या महिलांचे फोटो गिऱ्हाईकांना पाठवून वेश्याव्यवसायाठी मुलींची निवड करण्यास सांगायचा. त्यानंतर वेगवेगळ्या हॉटेलवर गिऱ्हाइकांना बोलावून तेथे महिलांच्या नावावर हॉटेलमध्ये रुम बुक करुन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत असायचा.
सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी हॉटेल कामिनी येथे गिऱ्हाईक पाठवून वेश्या व्यवसाय चालतो याची खात्री केली. सायंकाळी सहाच्या सुमारास येथे छापा टाकून दोन दिल्ली व एक छत्तीसगड येथील अशा तीन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली.