खालापूर – खोपोली शहरातील चिंचवली येथील डी. पी. रस्त्यावरील मैदानात 20 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मनोज जरांगे पाटील यांची जाहिर सभा होणार आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मराठा बांधवांनी या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे.
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीचा राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यतचा अल्टिमेटम देत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील रायगड दौऱ्यावर येणार आहेत. खोपोलीमध्ये 20 नोव्हेंबरला त्यांची जाहिर सभा होणार आहे. सभेसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील यांनी दिली. तसेच मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचक दर्शन घेवून जरांगे पाटील हे दौऱ्याला सुरूवात करणार आहेत.