पिंपरी – शहरामध्ये मंगळवारी (दि. 6) कोविडचे 176 बाधित रुग्ण आढळले. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या कोविडच्या 603 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरामध्ये गृहविलगीकरणात 735 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज दिवसभरात 4 हजार 159 संशयित रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. तर, करोनामुक्त झालेल्या 273 रुग्णांना घरी सोडण्यात आले. शहरात आत्तापर्यंत एकूण 17 लाख 95 हजार 165 रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी एकूण 2 लाख 70 हजार 786 बाधित रुग्ण आढळले. तर, 2 लाख 65 हजार 453 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 4 हजार 405 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरात आज दिवसभरात 10 हजार 436 नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत एकूण 15 लाख 51 हजार 921 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यामध्ये पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा समावेश आहे.