मुंबई – विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अनेकदा चाहत्यांना त्यांच्या फोटोंद्वारे सुंदर अपडेट्स देत असतात. दोघेही आपल्या कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी कुटुंबासाठी वेळ काढतात. मग कधी ते सोबत हॉलीडेजसाठी जातात तर कधी ते मुलीसोबत आपल्या घरी वेळ घालवतात. आता देखील बंगळूरमध्ये असताना दोघांनी लंच डेट केल्याचे फोटोज समोर आले आहेत.
विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विराटने अनुष्कासोबत बंगळुरूच्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद घेतल्याचे समजते.विराट अनुष्काला बऱ्याच कालावधीनंतर सोबत पाहून चाहत्यांना देखील चांगलाच आनंद झाला आहे.
कामातून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर पडलेल्या विराटचे काही फोटो अनुष्काने शेअर केले आहेत. यावेळी दोघांनी बेंगळुरूमधील एका प्रसिद्ध फूड जॉइंटला भेट देऊन एकमेकांसोबतक्वालिटी टाइम स्पेंड केल्याचे समजते. यावेळी दोघांनी त्याठिकाणच्या स्टाफसोबत फोटो देखील काढल्याचे समजते.
विराट-अनुष्काने इडली-साबरवर मारला ताव
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ‘सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेंगळुरूमध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह सेंट्रल टिफिन रूमला भेट दिली. यादरम्यान प्रत्येकाने इडली-डोसा, सांबर आणि वडा या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
अनुष्का शर्माने या फॅमिली आउटिंगचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे आई-वडील एकत्र उभे आहेत आणि अनुष्का तिच्या आईच्या बाजूला उभी आहे. या ग्रँड लंचनंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी आईस्क्रीमचा आस्वाद देखील घेतला.सेंट्रल टिफिन रूम (CTR) च्या इंस्टाग्राम पेजवरून विराट-अनुष्काचे आणखी काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे तेथील कर्मचाऱ्यांसोबत पोज देताना दिसत आहेत.
अनुष्काने शाहरुख,सलमान आणि आमिर खान अशा इंडस्ट्रीतील तीनही बड्या खानसोबत काम केलेलं आहे. अनुष्का शर्माचा ‘चकदा एक्सप्रेस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात अनुष्का क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे.