PBKS vs DC : टॉस गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या अभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या 20 व्या षटकात 25 धावा दिल्या. त्यामुळे दिल्लीला मोठी मजल मारण्यात यश आले.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पंजाब किंग्ज मैदानात उतरले. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात पंजाब किंग्जची धावसंख्या 17 धावा. | PBKS vs DC
इशांतच्या षटकात पंजाबला दोन झटके
पंजाब किंग्जला चौथ्या षटकात 34 धावांवर पहिला धक्का बसला. डावाच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने शिखर धवनला क्लीन बोल्ड केले. धवनने 16 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. | PBKS vs DC
यानंतर, पाचव्या चेंडूवर, प्रभासिमरनने सरळ शॉट खेळला जो इशांतच्या बोटाला लागला आणि नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी विकेटवर आदळला. यावेळी बेअरस्टो क्रीझबाहेर असल्याने तो धावबाद झाला. बेअरस्टो तीन चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. चार षटकांनंतर पंजाबची धावसंख्या दोन बाद 42 धावा अशी होती. | PBKS vs DC
त्यानंतर पंजाबला आणखी एक धक्का बसला अन् पंजाबची तिसरी विकेट गेली. प्रभसिमरन सिंग 26 धावांची इनिंग खेळून बाद झाला. पंजाब किंग्जने 10 षटकांत 87 धावा बोर्डावर लावल्या होत्या. पंजाबला विजयासाठी आणखी 10 षटकांत 88 धावांची गरज आहे. | PBKS vs DC