रुग्णांनी अशी घ्यावी काळजी

कागदपत्रे जवळ बाळगा ः घाबरून जाऊ नका, आवश्‍यक साहित्य घ्या

प्रकाश गायकर
पिंपरी –
महापालिकेच्या रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केले जाते. चाचणीसाठी स्वॅब घेऊन तुमच्यामध्ये लक्षणे नसतील तर तुम्हाला घरी सोडले जाते. त्यानंतर एका दिवसांनी तुमचा अहवाल येतो. यामध्ये तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या घरी फोन येतो. तेथून पुढे एकच धावाधाव होते. काय करावे ते सूचत नाही. मात्र असे न करता डोकं शांत ठेवून रुग्णालयात दाखल होत असताना आपल्याला काय हव ते साहित्य घ्यायचे आहे. अशा वेळी घाबरून न जाता डोक शांत ठेवायचे आहे. अशा वेळी काय केले पाहिजे आणि काही नाही, याबाबत करोना वॉर्डमधून बाहेर पडलेल्या रुग्णांच्या अनुभवावर आधारित…

तुमच्या स्वॅबचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर तुम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांचा फोन येतो. पीपीई कीट घातलेले कर्मचारी तुमच्या घरी येतात. त्यामुळे आजूबाजूचे लोकही घाबरतात. नागरिकांकडेही चौकशी सुरू असल्याने जो रुग्ण आहे तो तणावामध्ये येतो. याच तणावामध्ये आपल्याला रुग्णालयात काय साहित्य लागेल याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनाही लक्ष राहत नाही. तसेच त्यानंतर घरातल्या सदस्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवायचे असते. त्यांना तातडीने चाचणीसाठी नेण्याचा आग्रह सुरू असतो. अशावेळी रुग्णवाहिका येण्यापूर्वीच आवश्‍यक साहित्य घेण्याची गरज असते.
रुग्णांनी ह्या वस्तू बरोबर घ्याव्यात
ब्रश, पेस्ट, दंतमंजन, दहा-बारा दिवसांसाठी लागणारे कपडे, चादर, काही औषधे सुरू असतील तर ती घ्यावीत. आंघोळीचा साबण, तेल, कंगवा, गरम पाण्यासाठी थर्मास, काही फळे, बिस्कीट, सॅनिटायझर, मास्क हे साहित्य घेऊनच रुग्णालयात दाखल व्हावे.
प्रशासनाने द्यायची माहिती
रुग्णाला घेण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाइकांना काय बरोबर घ्यावे, किती दिवस रहावे लागेल याची थोडक्‍यात माहिती द्यावी. ही माहिती दिल्यास रुग्ण आणि नातेवाइकांची भीती थोडी दूर होईल. रुग्णांना नेण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गडबड केल्याने रुग्णामध्ये भीती निर्माण होऊ शक्‍यते. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी सहानुभूतीने वागावे.
कागदपत्रे आवश्‍यक
संबंधित रुग्ण व त्यांच्या घरातील सदस्यांनी आधारकार्ड, रेशनकार्डच्या झेरॉक्‍स सोबत घेण्याची आवश्‍यकता असते. डिस्चार्ज देताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे घेत असताना आठवणीने झेरॉक्‍स सोबत घ्याव्यात. कारण मोबाईलमध्ये कागदपत्रे असली तरी वेळेवर प्रिंट भेटत नाही. तसेच दुकाने बंद असल्याने विनाकारण धावपळ करावी लागते.

घरातील सदस्यांसाठी आवश्‍यक
एखाद्या घरामधील व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला तर त्या घरातील सदस्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवतात. विलगीकरण कक्षामध्ये आठ-दहा दिवस रहावे लागते. याची जाणीव ठेवून आवश्‍यक साहित्य घ्यावे. कारण त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरी काही दिवसांसाठी त्याना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. अशावेळी घरी राहता येते. मात्र त्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व प्रशासनाच्या पत्राची आवश्‍कता असते. तसेच घरी राहयचे नसेल हॉटेलमध्ये राहयचे असेल तरी ही कागदपत्रे आवश्‍यक असतात.

या आजाराची भीती खूप पसरली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे समजले की रुग्ण व नातेवाईकदेखील घाबरून जातात. रुग्णालयात भरती झाल्यावर डॉक्‍टरांनी सांगितलेल्या वेळेनुसार सर्व गोष्टींचे पालन करावे. घाबरून न जाता वेळेत आहार व औषधोपचार घेतले की चार दिवसांतच आराम वाटतो. रुग्णांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा.
– करोनामुक्त झालेला रुग्ण

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.