बारामती -बारामती शहर व तालुक्यातील आत्तापर्यंत 111 करोना संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 60 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत बारामतीत 41 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून ते (दि.25) पर्यंत करोनामुक्त रुग्णांची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर आणि तालुक्यांसाठी हे आशावादी चित्र दिसत आहे.
शहर व तालुक्यात 111 करोना संक्रमित रुग्ण आतापर्यंत आढळून आले असले तरी देखील. सद्यस्थितीमध्ये 41 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या 41 रुग्णांपैकी अकरा रुग्णांना सौम्य प्रकारची लक्षणे आहेत. रुई ग्रामीण कोविड सेंटरमध्ये 20 रुग्ण उपचार घेत आहेत. सिल्व्हर ज्युबली शासकीय रुग्णालयात 8 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे येथील रुग्णालयात 3 रुग्ण दाखल आहेत.
एका लहान मुलावर घरी उपचार सुरू आहेत. शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. असे असले तरी संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आत्तापर्यंत 60 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. 41 रुग्ण उपचार घेत आहेत. तीन दिवसांत रुग्णांची संख्या वाढली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला भीलवाडा त्यानंतर बारामती पॅटर्न राबविण्यात आला.
नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शहर त्यावेळी करोनामुक्त झाले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येताच रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास करोनाची साखळी मदत होणार आहे.