मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार आपल्या टाइम शेड्युलसाठी प्रसिद्ध आहे. अक्षय सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले नियोजनबद्ध काम करताना दिसतो. म्हणूनच अक्षय वर्षाला तब्बल पाच चित्रपट करतो. परंतु नुकतंच अक्षय कुमारने आपल्या चित्रपटांच्या शुटिंगमधून वेळ काढून केदारनाथचे दर्शन घेतले.
समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनला पोहोचला होता. अशा स्थितीत त्याने हेलिपॅडवरून केदारनाथ गाठले. डेहराडूननंतर अभिनेता शुटिंगसाठी दोन दिवस रुरकीमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हर हर महादेवच्या गजरात अक्षय कुमारने भक्तिभावाने केदारनाथचे दर्शन घेतले. त्याचे काही व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. अक्षय कुमार सकाळी पोलिस बंदोबस्तात केदारनाथ धामला पोहोचला. यावेळी त्याने मंदिरामध्ये पूजा देखील केली.
View this post on Instagram
मंदिरातून बाहेर आल्यानंतर अक्षयने ‘जय भोलेनाथ’चा जयघोषही केला. मंदिरात खिलाडी कुमार आला आहे हे समजताच त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी त्याच्यासोबत कडेकोट बंदोबस्त देखील होता. त्यामुळे जमलेल्या गर्दीतून अभिनेत्याला वाट काढणे शक्य झाले.
#WATCH | Rudraprayag, Uttarakhand: Bollywood actor Akshay Kumar visited Baba Kedarnath temple today and offered prayers. pic.twitter.com/0KLkYSF8Cz
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 23, 2023
अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबाबत सांगायचे झाले तर तो लवकरच पूजा एंटरटेनमेंटच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. हा चित्रपट 2024 च्या ईदला रिलीज होत आहे.