नवी दिल्ली – आज महा शिवरात्री निमित्त केदारनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.आज (शनिवारी) याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाकडून जरी करण्यात आली. शिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्व शिव भक्तांना या निर्णयामुळे मोठा आनंद झाला आहे.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर येथेही यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे. परंपरेनुसार, दरवर्षी शिवरात्री उत्सवात केदारनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख पंचकेदार गद्दीस्थल ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे निश्चित केली जाते. यावेळी श्री केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 6.20 वाजता उघडणार असल्याची घोषणा करण्यात आली.
Doors of the Kedarnath Temple to be open on April 25: Ajendra Ajay, Chairman, Kedarnath Temple Committee
(File pic) pic.twitter.com/jzGR3O0j0A
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 18, 2023
यावर्षी 22 एप्रिलपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. दुसरीकडे, उत्तराखंडच्या चार धाममधील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे 22 एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे द्वार 27 एप्रिलला उघडले जाणार आहेत.यामुळे भक्तांनी आपल्या पुढील यात्रेसाठी तयारी सुरु केलीय आहे.