लंडन – 2023 या मावळत्या वर्षामध्ये जरी जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या असल्या तरी 2024 या नवीन वर्षामध्ये अनेक महत्त्वाच्या क्रीडा प्रकारामधील विजेतेपदाच्या स्पर्धा होणार आहेत साहजिकच 2024 हे वर्ष महत्त्वाच्या प्रमुख क्रीडास्पर्धांनी गाजणार आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024 हे ऑलिम्पिकचे वर्ष असणार आहे यावर्षी फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये ऑलिंपिक स्पर्धा होणार आहेत पॅरिसमध्ये तब्बल 100 वर्षांनी पुन्हा एकदा ऑलिंपिक स्पर्धा भरवण्यात येणार असल्याने या स्पर्धांबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले आहे 2024 च्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या ऑलिंपिक स्पर्धा पॅरिसमध्ये पार पडतील भारतासारख्या क्रिकेट प्रेमी देशांचा विचार करता यावर्षी टी20 या क्रिकेट प्रकारातील विजेतेपदाची विश्वचषक स्पर्धा होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे अमेरिकेने प्रथमच क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित असून यावर्षी या स्पर्धेमध्ये 16 संघ भाग घेणार आहेत याशिवाय याच वर्षी महिला क्रिकेटमधील टी ट्वेंटी अजिंक्यपद स्पर्धा सुद्धा बांगलादेशमध्ये होणार आहे.
फुटबॉल प्रेमींची आवडती युरो 2024 ही क्रिकेट स्पर्धा यावर्षी होणार आहे जगातील 24 प्रमुख देश या स्पर्धेत भाग घेणार आहेत
या प्रमुख क्रीडास्पर्धाव्यतिरिक्त दरवर्षी होणारे विम्बल्डन टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा अमेरिकन ओपन आणि फ्रेंच ओपन या सर्व टेनिस स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील जगभरातील क्रिकेट खेळणारे देश एकमेकांशी कसोटी क्रिकेट 50 षटकांचे क्रिकेट आणि 20 षटकांचे क्रिकेट या निमित्ताने एकमेकांशी भिडतील या वर्षभरात कसोटी क्रिकेटचे जे सामने होतील त्याचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर होणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्याची कसोटी मालिका यासाठी महत्वाची आहे केवळ भारताचा विचार करता आयपीएल ही महत्त्वाची फ्रॅंचाईजी क्रिकेट स्पर्धा नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहे साहजिकच जगाला पुन्हा एकदा करोनाचा धोका जरी जाणवत असला तरी हा धोका जर जास्त तीव्र झाला नाही तर या सर्व स्पर्धा वेळापत्रकाप्रमाणे पार पडतील.