मुंबई – बिग बॉस 13 फेम पारस छाबरा याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्याने तब्बल १२५ किलो वजन कमी केले आहे. पारसने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
त्याच्या या परिवर्तनाने चाहते इंप्रेस होत आहेत. पारस छाबरा यांनी १२५ किलो वजन कमी केले. पारसने त्याचा ‘Then and Now’चा फोटो शेअर केला आहे. एका फोटोमध्ये पारसचे पोट दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याचे ऍब्स फ्लॉंट करत आहे. फोटो शेअर करताना तो म्हणाला,’125 ते 100 किलो. आतापर्यंतचा प्रवास किती छान आहे. वजन कमी करण्याचा प्रवास आता आणखी मेहनत घेऊन पुढचा टप्पा सुरू करेल.’ असेही त्याने लिहिले आहे.
पारसबद्दल बोलायचे तर त्याने अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. मात्र, त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी बिग बॉस 13 मधून मिळाली. त्याची खरी बाजू या शोमध्ये पाहायला मिळाली. आधी सिद्धार्थ शुक्लासोबत भांडण आणि नंतर मैत्रीही चर्चेत आली. या शोमध्ये पारसच्या माहिरा शर्मासोबतच्या बाँडिंगचीही चर्चा झाली होती. शो सोडल्यानंतर तो रिलेशनशिपमध्ये आल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्याने नेहमीच आपली ओळख मित्र म्हणून करून दिली. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. काही काळापूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.