इस्लामाबाद – पाकिस्तानने अलिककडच्या काळात पेट्रोलियम पदार्थांवरील अधिभार वाढवावा अशी सूचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलच्या वाढत्या किंनतींविरोधात विरोधकांनी अलिकडेच आंदोलन केले होते. मात्र तरिही सरकारने पेट्रोलच्या किंमती वाझवल्या होत्या. आता पुन्हा सरकारकडून पेट्रोलच्या किंमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.
तेलशुद्धिकरणाचा अधिबार सरकारने वेढवावा असी सूचना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तान सरकारला केली आहे. मात्र हा अधिबार किती वाढवायचा हे जागतिक बाजारातील पेट्रोलच्या किंमतींवर अवलंबून असणार आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार शौकत तरिन यांच्या हवाल्याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या किंमती कमी झाल्या तर हा अधिभार वाढवणे सरकारला शक्य होईल, असे तरिन यांनी म्हटले आहे.
या किंमती थेट आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींवर अवलंबून असल्यामुळेच अलिकडच्या काळात पेट्रोलची दरवाढ करावी लागली असल्याचेही तरिन यांनी सांगितले. पेट्रोलवरील अधिभाराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर सुरू असलेल्या चर्चेतून मार्ग काढला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.